बिलाच्या विरोधाचे ७५ दिवस : हाँगकाँगमध्ये सर्वाधिक १७ लाख लोक उतरले रस्त्यावर; चीन घाबरला

न्यूयॉर्क/हाँगकाँग -काश्मीरमधून ३७० कलम रद्द झाल्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांत नेणारा चीन हाँगकाँगमधील निदर्शनांमुळे संतापला आहे. त्याने हाँगकाँगच्या आंदोलकांच्या बाजूने आवाज उठवणाऱ्या देशांना धमकावणे सुरू केले आहे. पहिला इशारा कॅनडाला दिला आहे. ओटावातील चिनी दूतावासाने म्हटले की,‘कॅनडाने हाँगकाँगच्या प्रकरणांत हस्तक्षेप बंद करावा. हा पूर्णपणे चीनचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात कोणताही देश, संघटना किंवा व्यक्तीने दखल देऊ नये.’ चीनने हा इशारा कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड आणि युरोपीय युनियनच्या परराष्ट्र धोरणाच्या अध्यक्ष फेडेरिका मोघेरिनी यांच्या वक्तव्यानंतर दिला आहे. या दोघांनी संयुक्तरीत्या म्हटले होते की, आम्ही हाँगकाँगच्या निदर्शकांना पाठिंबाा देतो. शांततापूर्ण निदर्शनांचा अधिकार हाँगकॉँगच्या मूळ कायद्यात अंतर्भूत आहे.ट्रम्प म्हणाले- तियानमेनची पुनरावृत्ती झाल्यास व्यवसायावर परिणाम : चीननेहाँगकाँग सीमेवर लष्करी कारवाईला वेग दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी धमकी दिली होती की, निदर्शकांवर तियानमेन चौकासारखी कारवाई झाल्यास दोन्ही देशांच्या आर्थिक चर्चेचे मोठे नुकसान होईल.तयारी : जंगल, समुद्राने घेरलेल्या शेनझेंगमध्ये सैनिक तैनातचीनने हाँगकाँगच्या निदर्शकांना कडक इशारा देण्यासोबतच त्यांना दहशतवादी म्हटले. चीन त्यांच्यावर कडक कारवाईची तयारीही करत आहे. हाँगकाँगच्या सीमेला लागून असलेले जंगलासोबत पाण्याने घेरलेल्या शेनझेंगमध्ये क्रीडा, कला आणि भाषा अकादमीचे काम चालते. पण तेथे चीनने आपल्या पीपल्स आर्म्ड फोर्सच्या जवानांना ११ ऑगस्टपासून तैनात करणे सुरू केले होते. फोर्सचे जवान आपल्या अधिकाऱ्यांच्या निर्देशावरून तेथे लष्करी सराव करत आहेत.उपाय : आता व्हायरल केले जात आहेत चिनी रॅपरचे व्हिडिओ> चीनने बंड थांबवण्यासाठी प्रपोगंडाची मदत घेतली आहे. तो पसरवण्यासाठी चिनी राष्ट्रवादी रॅप ग्रुपची गाणी वाजवली जात आहेत. ते व्हायरल केले जात आहेत. रॅप व्हिडिओत पोलिसांशी चकमक करणाऱ्या निदर्शकांची व्हिडिओ क्लिप आहे. त्यात ते तोडफोड करत असल्याचे दिसत आहे.> ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न, सिडनीत हाँगकाँगच्या निदर्शकांच्या समर्थनार्थ फेरी काढली.> लंडनमध्ये निदर्शकांना पाठिंबा, चीनच्या विरोधात निदर्शने.बिलाच्या विरोधाचे७५ दिवस3 एप्रिल : हाँगकाँग सरकारने संशोधित प्रत्यर्पण बिल आणण्याचा प्रस्ताव दिला. त्यात हाँगकाँगच्या लोकांना खटल्यासाठी चीनला सोपवण्याची तरतूद आहे. विरोध झाला कारण दुरुपयोगाची भीती आहे.9-12 जून : प्रस्तावित विधेयकाविरोधात १० लाख लोकांनी शांतता फेरी काढली. बिलाचा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी केली. तीन दिवस हिंसक निदर्शने झाली. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.15-21 जून : सरकारच्या मुख्य कार्यकारी कॅरी लॅम म्हणाल्या-मी बिल अनिश्चित काळापर्यंत स्थगित करत आहे. दुसऱ्या दिवशी १० लाख लोकांची फेरी. १२ जूनला आंदोलक विधान परिषदेत पोहोचले.9-27 जुल ै: कॅरी लॅम म्हणाल्या- प्रत्यर्पण बिल आता मृतप्राय आहे. मात्र, बिल पूर्णपणे मागे घेतले नाही. निदर्शनात चीनच्या लायझनिंग ऑफिसमध्ये तोडफोड. सरकारी कर्मचारीही सामील झाले.3 ऑगस्ट ते आतापर्यंत : चीनच्या विरोधात निदर्शने सुरू. ११ ऑगस्टला विमानतळावर निदर्शकांनी कब्जा केल्याने उड्डाणे बंद. १८ ऑगस्टला आतापर्यंतची सर्वात मोठी फेरी. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Hong Kong has the 17 lakh highest number of people on the streets; China was scared


 बिलाच्या विरोधाचे ७५ दिवस : हाँगकाँगमध्ये सर्वाधिक १७ लाख लोक उतरले रस्त्यावर; चीन घाबरला

न्यूयॉर्क/हाँगकाँग -काश्मीरमधून ३७० कलम रद्द झाल्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांत नेणारा चीन हाँगकाँगमधील निदर्शनांमुळे संतापला आहे. त्याने हाँगकाँगच्या आंदोलकांच्या बाजूने आवाज उठवणाऱ्या देशांना धमकावणे सुरू केले आहे. पहिला इशारा कॅनडाला दिला आहे. ओटावातील चिनी दूतावासाने म्हटले की,‘कॅनडाने हाँगकाँगच्या प्रकरणांत हस्तक्षेप बंद करावा. हा पूर्णपणे चीनचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात कोणताही देश, संघटना किंवा व्यक्तीने दखल देऊ नये.’ चीनने हा इशारा कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड आणि युरोपीय युनियनच्या परराष्ट्र धोरणाच्या अध्यक्ष फेडेरिका मोघेरिनी यांच्या वक्तव्यानंतर दिला आहे. या दोघांनी संयुक्तरीत्या म्हटले होते की, आम्ही हाँगकाँगच्या निदर्शकांना पाठिंबाा देतो. शांततापूर्ण निदर्शनांचा अधिकार हाँगकॉँगच्या मूळ कायद्यात अंतर्भूत आहे.


ट्रम्प म्हणाले- तियानमेनची पुनरावृत्ती झाल्यास व्यवसायावर परिणाम : चीननेहाँगकाँग सीमेवर लष्करी कारवाईला वेग दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी धमकी दिली होती की, निदर्शकांवर तियानमेन चौकासारखी कारवाई झाल्यास दोन्ही देशांच्या आर्थिक चर्चेचे मोठे नुकसान होईल.

तयारी : जंगल, समुद्राने घेरलेल्या शेनझेंगमध्ये सैनिक तैनात

चीनने हाँगकाँगच्या निदर्शकांना कडक इशारा देण्यासोबतच त्यांना दहशतवादी म्हटले. चीन त्यांच्यावर कडक कारवाईची तयारीही करत आहे. हाँगकाँगच्या सीमेला लागून असलेले जंगलासोबत पाण्याने घेरलेल्या शेनझेंगमध्ये क्रीडा, कला आणि भाषा अकादमीचे काम चालते. पण तेथे चीनने आपल्या पीपल्स आर्म्ड फोर्सच्या जवानांना ११ ऑगस्टपासून तैनात करणे सुरू केले होते. फोर्सचे जवान आपल्या अधिकाऱ्यांच्या निर्देशावरून तेथे लष्करी सराव करत आहेत.

उपाय : आता व्हायरल केले जात आहेत चिनी रॅपरचे व्हिडिओ

> चीनने बंड थांबवण्यासाठी प्रपोगंडाची मदत घेतली आहे. तो पसरवण्यासाठी चिनी राष्ट्रवादी रॅप ग्रुपची गाणी वाजवली जात आहेत. ते व्हायरल केले जात आहेत. रॅप व्हिडिओत पोलिसांशी चकमक करणाऱ्या निदर्शकांची व्हिडिओ क्लिप आहे. त्यात ते तोडफोड करत असल्याचे दिसत आहे.
> ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न, सिडनीत हाँगकाँगच्या निदर्शकांच्या समर्थनार्थ फेरी काढली.
> लंडनमध्ये निदर्शकांना पाठिंबा, चीनच्या विरोधात निदर्शने.

बिलाच्या विरोधाचे७५ दिवस

3 एप्रिल : हाँगकाँग सरकारने संशोधित प्रत्यर्पण बिल आणण्याचा प्रस्ताव दिला. त्यात हाँगकाँगच्या लोकांना खटल्यासाठी चीनला सोपवण्याची तरतूद आहे. विरोध झाला कारण दुरुपयोगाची भीती आहे.

9-12 जून : प्रस्तावित विधेयकाविरोधात १० लाख लोकांनी शांतता फेरी काढली. बिलाचा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी केली. तीन दिवस हिंसक निदर्शने झाली. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.

15-21 जून : सरकारच्या मुख्य कार्यकारी कॅरी लॅम म्हणाल्या-मी बिल अनिश्चित काळापर्यंत स्थगित करत आहे. दुसऱ्या दिवशी १० लाख लोकांची फेरी. १२ जूनला आंदोलक विधान परिषदेत पोहोचले.

9-27 जुल ै: कॅरी लॅम म्हणाल्या- प्रत्यर्पण बिल आता मृतप्राय आहे. मात्र, बिल पूर्णपणे मागे घेतले नाही. निदर्शनात चीनच्या लायझनिंग ऑफिसमध्ये तोडफोड. सरकारी कर्मचारीही सामील झाले.

3 ऑगस्ट ते आतापर्यंत : चीनच्या विरोधात निदर्शने सुरू. ११ ऑगस्टला विमानतळावर निदर्शकांनी कब्जा केल्याने उड्डाणे बंद. १८ ऑगस्टला आतापर्यंतची सर्वात मोठी फेरी.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Hong Kong has the 17 lakh highest number of people on the streets; China was scared