दोन वर्षांत अमेरिका मंदीच्या कचाट्यात येऊ शकते : सर्वेक्षण

वॉशिंग्टन -पुढील एक ते दाेन वर्षांत अमेरिका मंदीच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी सर्वेक्षणात व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या शिखर बँकेने उचललेल्या पावलांमुळे मंदी काहीशी पुढे ढकलली गेली आहेे. नॅशनल असाेसिएशन फाॅर बिझनेस इकाॅनाॅमिस्ट (एनएबीई) सर्वेक्षणात २२६ अर्थतज्ज्ञांची मते घेतली. यामध्ये ७४ टक्के अर्थतज्ञांनी अमेरिकेत पुढील एक ते दाेन वर्षांत अर्थव्यवस्था मंदीच्या कचाट्यात येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यात २% जणांनी अमेरिकत या वर्षातच मंदी येऊ शकते, ३८ टक्क्यांनी मंदी पुढील वर्षात येण्याची शक्यता व्यक्त केली. ३४ टक्के अर्थतज्ज्ञांनी पुढील वर्षानंतर अमेरिका मंदीच्या जाळ्यात येऊ शकते, असे म्हटले. या अगाेदर एनएबीईने फेब्रुवारीमध्ये केलेल्या सर्वेक्षणात १० टक्के अर्थतज्ज्ञांनी या वर्षी अमेरिकेत मंदी येण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता.ट्रम्प म्हणाले, ग्राहकांकडे भरपूर पैसे, ते खर्च करतातअमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प म्हणालेे, मी सर्व गाेष्टींसाठी तयार आहे. आम्ही खूप चांगले करत आहाेत. मी करामध्ये खूप सूट दिली आहे. ग्राहकांकडे भरपूर पैसे आहेत. ते वस्तू खरेदी करत आहेत. मी वाॅलमार्टची आकडेवारी पाहिली असून त्यात वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे देशात मंदी येईल, असे वाटत नाही.मुख्य आर्थिक सल्लागारांनी आर्थिक मंदी नाकारलीट्रम्प यांचे मुख्य सल्लागार लॅरी कुडलाे यांनीही मंदीला फारसे महत्त्व दिले नाही. ते म्हणाले, मला काेणतीही मंदी दिसत नाही. ग्राहक चांगल्या पगारावर काम करत आहेत. ते वेगाने पैसे खर्च करत आहेत, तेवढीच बचत करत आहेत. त्यामुळे २०१९च्या दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्था चांगली असेल. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today America may be in recession in two years: Survey


 दोन वर्षांत अमेरिका मंदीच्या कचाट्यात येऊ शकते : सर्वेक्षण

वॉशिंग्टन -पुढील एक ते दाेन वर्षांत अमेरिका मंदीच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी सर्वेक्षणात व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या शिखर बँकेने उचललेल्या पावलांमुळे मंदी काहीशी पुढे ढकलली गेली आहेे. नॅशनल असाेसिएशन फाॅर बिझनेस इकाॅनाॅमिस्ट (एनएबीई) सर्वेक्षणात २२६ अर्थतज्ज्ञांची मते घेतली. यामध्ये ७४ टक्के अर्थतज्ञांनी अमेरिकेत पुढील एक ते दाेन वर्षांत अर्थव्यवस्था मंदीच्या कचाट्यात येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यात २% जणांनी अमेरिकत या वर्षातच मंदी येऊ शकते, ३८ टक्क्यांनी मंदी पुढील वर्षात येण्याची शक्यता व्यक्त केली. ३४ टक्के अर्थतज्ज्ञांनी पुढील वर्षानंतर अमेरिका मंदीच्या जाळ्यात येऊ शकते, असे म्हटले. या अगाेदर एनएबीईने फेब्रुवारीमध्ये केलेल्या सर्वेक्षणात १० टक्के अर्थतज्ज्ञांनी या वर्षी अमेरिकेत मंदी येण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता.

ट्रम्प म्हणाले, ग्राहकांकडे भरपूर पैसे, ते खर्च करतात

अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प म्हणालेे, मी सर्व गाेष्टींसाठी तयार आहे. आम्ही खूप चांगले करत आहाेत. मी करामध्ये खूप सूट दिली आहे. ग्राहकांकडे भरपूर पैसे आहेत. ते वस्तू खरेदी करत आहेत. मी वाॅलमार्टची आकडेवारी पाहिली असून त्यात वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे देशात मंदी येईल, असे वाटत नाही.

मुख्य आर्थिक सल्लागारांनी आर्थिक मंदी नाकारली
ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार लॅरी कुडलाे यांनीही मंदीला फारसे महत्त्व दिले नाही. ते म्हणाले, मला काेणतीही मंदी दिसत नाही. ग्राहक चांगल्या पगारावर काम करत आहेत. ते वेगाने पैसे खर्च करत आहेत, तेवढीच बचत करत आहेत. त्यामुळे २०१९च्या दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्था चांगली असेल.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
America may be in recession in two years: Survey