ड्रग्सचे लोन इंदापूरात; इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यावर CBI ची धाड..?

कोट्यावधी रुपयांचा ड्रग व्यापार आणि व्यवहारा सहित सप्लाय होत असलेली चर्चा...?

ड्रग्सचे लोन इंदापूरात; इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यावर CBI ची धाड..?

जितेंद्र जाधव 

इंदापूर/प्रतिनिधी:-

देशभर आणि राज्यांमध्ये ड्रग्स चे प्रकरण गाजत असताना याचे लोन इंदापूर पर्यंत पोहोचले आहे. शुक्रवार दि.१७ रोजी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील एका गाळ्यावर सीबीआय व आयटी विभागाने धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे सतत चर्चेत असलेले ड्रग्स चे लोन थेट इंदापूर मधील मोठ्या संस्थेपर्यंत पोहोचले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आरोग्यास घातक असलेल्या ड्रग्स चा व्यापार आणि व्यवहार व साठवणूक होत असल्याची गोपनीय माहिती सीबीआय व आयटी विभागाला कळताच संबंधित विगभागाच्या डझनभर अधिकाऱ्यांनी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका गाळ्यावर धाड टाकली आहे. टाकलेल्या धाडीमध्ये संबंधित गाळ्यात काय मिळाले हे अजून समजू शकले नाही.मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्केट कमिटीतील काही अधिकाऱ्यांची व जबाबदार लोकांची कसून चौकशी केल्याची माहिती मिळत आहे.

सूत्रांकडून माहितीनुसार सदरचे ड्रग्स हे केळी पॅकिंग व टीव्ही बॉक्स मधून पाठवले जात असल्याचा सीबीआय व आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय होता. तसेच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये G-5  कंपनी केळी पॅकिंग मोठ्या प्रमाणात करत होती. त्या मुळे केळी बॉक्समध्ये काही केमिकल स्वरूपातील ड्रग्स पाठवले जात असल्याची माहिती संबंधित विभागाला मिळाल्यानंतरच धाडी पडल्या आहेत.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यामध्ये नावलौकिक असलेली बाजार समिती आहे. या बाजार समितीवर संचालक म्हणून एक विद्यमान आमदार, एक जिल्हा बँकेचे संचालक, एक विद्यमान आमदाराचा भाऊ यांच्यासह अनेक अनुभवी इंदापूर तालुक्यातील नेते आहेत. मात्र इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पडलेल्या या सीबीआय व  आयटी विभागाच्या धाडीमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चेंना पेव फुटला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सीबीआयच्या धाडी पडल्या मात्र काही मिळाले नाही :- विलास माने (सभापती- कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर) 


सीबीआय व आयटी विभागाच्या धाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका गाळ्यात पडल्या आहेत. मात्र त्यामध्ये काही सापडले नाही. त्या गाळ्यावरती कोणीतरी बोर्ड लावला आहे त्याचा आणि आमचा संबंध नाही. संबंधित गाळा आम्ही प्रतीक घोगरे व प्रतीक घोगरे यांच्या आई यांना  भाड्याने दिला होता. त्यामुळे त्यांनी बाहेरच्या बाहेर काही उद्योग केला असेल मात्र आमच्या मार्केट कमिटी मध्ये काहीही वस्तू आणल्या नाहीत. सीबीआय च्या लोकांबरोबर चर्चा करताना असे समजले की टीव्ही बॉक्समध्ये काहीतरी केमिकल आणले होते. मात्र,सीबीआय च्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून ते बघून गेले आहेत. तसेच मार्केट कमिटी मधून G5 कंपनी केळी व्यापारी काहीतरी एक्सपोर्ट करत आहे त्याच्या पत्नीला जास्त पगार आहे. त्यावरतीच तो व्यापार करत आहे अशी माहिती इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास माने यांनी दै प्रीतीसंगम ला भ्रमणध्वनी द्वारे दिली आहे.