'शरदाचंं चांदणे......'. ,'रणजीपटू' हा टिळा गुणवान खेळाडूच्या माथी लागला नाही.

शरद पानसे यांच्या स्मरणार्थ एखादी क्रिकेट स्पर्धा निरंतर चालू केली तर तीच त्यांची आठवण सातारा क्रिकेट जगतात त्यांचे नाव अजरामर करून जाईल.

'शरदाचंं चांदणे......'. ,'रणजीपटू' हा टिळा गुणवान खेळाडूच्या माथी लागला नाही.
'शरदाचंं चांदणे......'. ,'रणजीपटू' हा टिळा गुणवान खेळाडूच्या माथी लागला नाही.

अनिल कदम / उंब्रज.


त्यांना पाहताक्षणीच,
वेस्ट इंडियन वाटायचे 
ते वर्णामुळे नाहीतर त्यांच्या देहबोली मुळे,
त्यांची विंडीज थाटातली,
तरीही शास्त्रशुद्ध शैलीदार फलंदाजी, 
क्षेत्ररक्षणातील चमक,
यष्टीरक्षणातील चपळाई,
केवळ नेत्रसुखद भुलवणारी,
हो मी शरद पानसे बद्दलच बोलतोय..

शरद पानसे हे शरद महाजनी (अण्णा) यांचे पेठकरी. यामुळे यादोगोपाळ पेठेतील त्याची दोन्ही घरे ही सीमारेषेच्या अंतरा एवढीच. शाळकरी वयात अण्णांना आकर्षण होतं, त्यांच्यापेक्षा चार-पाच वर्षांनी मोठे असलेले शरद पानसे, अविनाश रानडे यांचं ,तेही जवळच रहात असत. 

जेमतेम सव्वा पाच फूट उंची, मजबूत देहयष्टी दणकट तरीही लवचिकता पुरेपूर भरलेलं,मनगट चालण्याची विशिष्ट लकब आणि मुळातच असलेली आक्रमक वृत्ती अगदी 'शरदाच्या चांदण्या'प्रमाणे.

त्यांची फलंदाजी पाहणे हा नेत्रसुखद अनुभव होता. शैलीदार ड्राईव्ह, रोहन करायच्या थाटातला स्वीप, खणखणीत पूल, हुक, हे सारे फटके ते लीलया खेळायचे, त्या काळातल्या मातब्बर गोलंदाजांचा त्यांनी नेटाने सामना केला.अफजल पठाण बरोबरची त्यांची 'जुगलबंदी' तत्कालीन सहकऱ्यांना व  दर्शकांना आजही आठवतेय. अफजल यांचा तिखट मारा आणि तेवढेच तोलामोलाची फलंदाजी हे द्वंद्व अनेकांनी 'याची देही याची डोळ्या'ने प्रेक्षक म्हणून अनेकांनी पाहिलं होतं.तेव्हा पंच म्हणून समोर उभ्या असलेल्या आण्णा महाजनी यांना सुद्धा टाळ्यांचा मोह आवरताना नाकी नऊ आले होते. शरद पानसे अफझल पठाण यांना नेहमी 'छबी' असा उल्लेख करत असत.दोघांची मैत्री 'जिंदादिल'अशीच होती. 

कुपरची टीम त्यावेळी 'दादा' होती .मधु खडकीकर, वसंत लोहार, शरद पानसे, मामा जाधव, रमजान शेख, इस्माईल शेख यांच्यासारखे नावाजलेले खेळाडू होते. वालचंद इंडस्ट्रीच्या एका मॅच मध्ये कसोटीपटू चंदू बोर्डे यांच्याबरोबरची शरद पानसे यांची रेकॉर्डब्रेक पार्टनरशिप खूपच गाजली होती.

कूपरनंतर एस.टी.संघाकडून ही शरद पानसे क्रिकेट खेळले,तोही संघ चांगला होता. सातारा जिल्हा संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी केली.परंतु एवढी अफाट गुणवत्ता,मेहनतीची तयारी असूनही 'रणजीपटू' हा टिळा त्यांच्या माथी लागला नाही. त्यावेळी महाराष्ट्र संघात 'पुणेरी'बोलबाला होता. शिवाय परिस्थिती,गॉड फादर किंवा वरदहस्त नसल्याने शरद पानसे खूप वरच्या दर्जाचे क्रिकेट खेळू शकले नाहीत. त्याची 'सल' आयुष्यभर त्यांच्या मनात होती.कधी त्यांनी ती आपल्या जवळच्या मित्रांना बोलूनही दाखवली होती. 

शरद पानसे यांचा आणखी एक 'गुण' म्हणजे ते कायम क्रिकेटची प्रामाणिक राहिले होते. मैदानावर सुद्धा ते बाद असतील तर पंचांच्या निर्णयासाठी कधी क्षणभर थांबले नाहीत.त्यांचे चाहते खूप होते.आजही सातारा जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये त्यांची पदोपदी आठवण निघते हमखास निघते.ज्युनियर क्रिकेटपटूंसाठी ते 'सर' होते. परंतु त्यांचे समकालीन किंवा दोन-तीन वर्ष मागेपुढे असलेल्यांसाठी ते शरद किंवा शऱ्या पानसेच होते.त्या एकेरी उल्लेख करण्यामागे प्रेमही होतं आणि आदरही.

वयाच्या पन्नाशीतही ते खेळत असत,नवोदितांना मार्गदर्शन देत असत.शरद पानसरे यांच्या पत्नी खूप हुशार आणि सोशिक होत्या, त्यांचा मोठा मुलगा ठाण्यात स्थायिक झाला.धाकटा मुलगा सुनीलही क्रिकेट खेळायचा.परंतु आता ते मॅरेथॉन पट्टू म्हणून ओळखले जात आहेत.त्यांच्या आजारपणात अनेक मित्र सखे-सोबती त्यांना भेटले, पण त्यांची स्थिती पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी यायचे,आजारी असल्या कारणाने घरी झोपून असल्यामुळे ते आपले मित्र तसेच आण्णा महाजनी यांच्याशी फोनवर बोलत असत.त्यांचे निधन हे साताऱ्याच्या क्रिकेट विश्वातील दुःखद घटना होती.क्रिकेटसाठीच शरद पानसे यांचा जन्म झाला होता. ते क्रिकेटर म्हणूनच लोकप्रिय झाले.पण मित्र म्हणून ते चांगले होते. त्यांचा मित्रपरिवार ही त्यांची 'साक्ष' ठरेल शरद पानसे सर 'वुई मिस यू'

(सदरचा लेख शरद महाजनी (आण्णा) यांच्या नजरेच्या लेखणीतून.)