एकतर्फी प्रेमातून काळज येथील अवघ्या १० महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या

एकतर्फी प्रेमातून काळज येथील अवघ्या १० महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या

एकतर्फी प्रेमातून काळज येथील अवघ्या १० महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या

फलटण / प्रतिनिधी

फलटण तालुक्यातील काळजी येथील १० महिन्यांच्या चिमुकला ओम या चिमुकल्याचे अपहरण  केल्याची घटना घडली होती.मात्र काल गुरुवार दिनांक १ आॅक्टोंबर रोजी सकाळी ओम चे वडिल त्यांच्या घराच्या ५० मीटर लांब असलेल्या विहरीवर आंघोळ करण्यासाठी गेले असता तेथे त्यांना ओम चा मृतदेह आढळला,त्या नंतर परिसरात खळबळ उडाली होती.

१० महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह विहिरीत सापडल्याने सातारा पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली,आणि याच चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.सातारा जिल्ह्यातील या घटनेने नवीन वळण घेतले आहे.

हा संपूर्ण प्रकार हा एकतर्फी प्रेमातून केल्याचे समोर आले आहे.या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सातारा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत,व आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.

ओमच्या आईवर एका तरुणाचे एकतर्फी प्रेम होते, मात्र ओमची आई ही त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नव्हती,याच रागातून तरुणाने ओमचे अपहरण केले व दोन दिवसांनी त्यांची हत्या केली अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

१० महिन्यांच्या ओमला अपहरण करण्याचा डाव त्याच्या आईवर प्रेम करणा-या तरुणाने रचला होता.या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले व आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
सविस्तर माहिती लवकरच....