48 दिवसात 49 पेशंट बरे,उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राची थक्क करणारी कामगिरी

उंब्रजच्या महिला पोलीस अधिकारी झाल्या कोरोना मुक्त,उंब्रज झाले कोरोना मुक्त

48 दिवसात 49 पेशंट बरे,उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राची थक्क करणारी कामगिरी

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज ता.कराड येथील सातही कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त होवून घरी परतले असुन गुरुवारी महिला पोलीस अधिकाऱ्यास कृष्णा रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला त्यामुळे उंब्रज कोरोना मुक्त झाले आहे. रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या शेवटच्या कोरोना मुक्त रुग्णाचे उंब्रज येथे आरोग्य विभाग,पोलीस व ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून  जोरदार स्वागत केले.उंब्रज येथील सातही बाधितांपैकी व त्यांच्या संपर्कातील लोकांचे  रिपोर्ट यापुर्वी निगेटिव्ह आले असल्याने उंब्रज  कोरोना मुक्त झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.  
      
उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार, डॉ. स्नेहा निकम, सपोनि अजय गोरड, संग्रामसिंह पलंगे, उपसरपंच अजीत जाधव, डॉ. दिपक माने, डॉ. कुलकर्णी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना मुक्त झालेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याचे स्वागत करुन उंब्रज कोरोना मुक्त झाल्याचा संदेश दिला.  मागील महिन्यात उंब्रज येथे चोरे रोड लगत एका काँलनीत वास्तवास असणाऱ्या युवतीचे रिपोर्ट कोरोना बाधित आले होते. त्यानंतर उंब्रजमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.  त्यानंतर आठवड्याभरात उंब्रज येथील एक बालरोगतज्ज्ञही कोरोना बाधित झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. पंरतु पहिल्या टप्प्यात हे दोघेही कोरोना मुक्त झाले त्यामुळे उंब्रजचा कोरोना मुक्तीकडे प्रवास सुरू झाला पंरतु तोच युवतीच्या निकटवर्तीयापैकी तिचे वडील व अन्य एक असे दोघांचे रिपोर्ट पाँझिटीव्ह आल्याने पुन्हा धास्ती वाढली. पंरतु पंधरा दिवसात हे दोघेही कोरोना मुक्त झाले त्यामुळे दिलासा मिळत होता तोच परजिल्हातून प्रवास करुन आलेल्या तिघांची भर पडली. तसेच मागील आठवड्यात मुंबई येथून आलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यासही कोरोना झाल्याचे रिपोर्ट आल्याने चितेंचे वातावरण होते. पंरतु गुरुवारी या महिला पोलीस अधिकाऱ्यास डिस्चार्ज मिळाल्याने उंब्रज कोरोना मुक्त झाले आहे. यावेळी डॉ. संजय कुंभार म्हणाले, उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत २४ गावे असुन त्यापैकी पाच गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले. सुरुवातीला चरेगाव त्यापाठोपाठ वनवासमाची,खोडशी, उंब्रज, खालकरवाडी येथे रुग्ण सापडले. ही सर्व गावे कोरोना मुक्त झाली असून वनवासमाचीतील ३९ रुग्णांसह उंब्रज आरोग्य केंद्रातंर्गत ४९ रुग्ण सर्वांच्या सहकार्याने  कोरोना मुक्त झाले आहेत.

विना ऑक्सिजन, सर्वजण सुखरूप घरी

प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज यांच्या नियंत्रणाखाली गावातील ४९ कोरोना बाधित रुग्ण ४८ दिवसात           ठणठणीत बरे होऊन घरी गेल्याने उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरिकांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.चरेगाव 1 ,खोडशी 1,खालकरवाडी 1,वनवासमाची 39,उंब्रज 7 असे सर्व गावातील मिळून 49 जण मुक्त झाले. तसेच कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन न लावता व एकही कोरोनाबाधित रुग्ण न दगावता प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेले कार्य निश्चितच सर्वांच्या नजरेत भरत आहे.