कराड तालुक्यातील पंधरा जण कोरोना मुक्त, वनवासमाचीकरांना मोठा दिलासा

जिल्ह्यातील आजपर्यंत 60 जण कोरोनामुक्त झाले असून,कराड शहरात फक्त एकजण कोरोना बाधित रुग्ण उरला आहे. यामुळे कराडकरांना दिलासा मिळाला आहे. तर वनवासमाचीची वाटचाल कोरोना मुक्तीकडे होत आहे.कराडच्या सह्याद्री हॉस्पीटल मधून 12 तर कृष्णा मधून 03 अश्या 15 कोरोनामुक्त रुग्णाना डिस्चार्ज मिळाला आहे.15 पैकी 12 जण वनवासमाचीचे रुग्ण झाले कोरोनामुक्त,वनवासमाचीला मोठा दिलासा मिळाला आहे.कोरोनावर यशस्वी मात करत तालुक्यातील 15 जण परतले सुखरूप घरी परतल्यानंतर तालुक्यातील वातावरण दिलासादायक झाले आहे.

कराड तालुक्यातील पंधरा जण कोरोना मुक्त, वनवासमाचीकरांना मोठा दिलासा

कराड/प्रतिनिधी

कोरोना हॉट-स्पॉट वनवसमाची येथील कोव्हीडच्या अकरा रुग्णांना सह्याद्रिमधून तर एका रुग्णाला कृष्णेतून डिस्चार्ज मिळाला आहे.सह्याद्रि हॉस्पिटल कराड येथून शुक्रवारी आणखी बारा कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात वैद्यकीय अधिकारी व सह्याद्रिच्या स्टाफने सर्व रुग्णांचे अभिनंदन केले. बारा रुणांपैकी ११ रुग्ण हे वनवासमाची येथील असून एक रुग्ण खोडशी येथील आहे. या सर्व बारा रुग्णांचे तपासणी अहवाल दि २ मे रोजी पॉसिटीव्ह आल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालय कराड येथे दाखल करण्यात आले होते व तदनंतर हे रुग्ण सह्याद्रि हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. या सर्व रुग्णाची पुनर्तपासणी दि १३ मे रोजी करण्यात आली होती व त्यांचे वैद्यकीय अहवाल दि १४ मे रोजी उशिरा प्राप्त झाले व नेगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. या बारा रुग्णांमध्ये ८ पुरुष तर ४ स्त्रिया आहेत.  वनवसमाचीच्या ११ रुग्णांमध्ये एका कुटुंबातील ४ जण, पाच वर्षांची एक मुलगी, बारा वर्षांचा एक मुलगा व  ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले तीन रुग्ण यांचा समावेश आहे. खोडशी येथील ३० वर्षांच्या रुग्णाला देखिल डिस्चार्ज देण्यात आला आहे.
     उपजिल्हा रुग्णालय कराड येथील ३१ कोरोना बाधित पेशन्ट हे सह्याद्रि हॉस्पिटल मध्ये स्थलांतरित केले होते त्या पैकी एकूण १८ रुग्ण कोरोनमुक्त झाले असून त्यापैकी आज बारा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संगीता देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ आर जी काटकर, सह्याद्रि हॉस्पिटलचे संचालक मा. दिलीपभाऊ चव्हाण, सह्याद्रि हॉस्पिटलचे कामकाज अधिकारी डॉ वेंकटेश मुळे व सहाय्यक व्यवस्थापक विश्वजीत डुबल आदी उपस्थित होते.
   सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथील एक संपूर्ण इमारत कोविड -१९ रुग्णांसाठी समर्पित करण्यात आली असून येथे ५० बेडची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. सह्याद्रि हॉस्पिटलने कोरोना वॉरियर्स ची टिम तयार केली असून त्यामध्ये अनुभवी डॉक्टर्स व कुशल नर्सिंग स्टाफ यांचा समावेश असून हे कोरोना वॉरियर्स कोविड-१९ बिल्डिंगमध्ये २४ X ७ रुग्णसेवेत कार्यरत आहेत.

कृष्णा हॉस्पिटलमधून 3 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज

कोरोना वॉरियर्स'ना कृष्णा हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांकडून मानवंदना देण्यात आली,कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधून आज 3 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी कोरोनामुक्त रुग्णांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच यावेळी कृष्णा हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांकडून 'कोरोना वॉरियर्स'ना मानवंदना देण्यात आली. 

कृष्णा हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या कोरोनामुक्त रुग्णांमध्ये कराड रुक्मिणीनगर येथील 28 वर्षीय महिला, मलकापूर येथील 55 वर्षीय महिला आणि वनवासमाची येथील 74 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. 

या सगळ्यांवर हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफ आणि सुरक्षा रक्षकांकडून फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णांचे हॉस्पिटलच्या प्रांगणात आगमन झाल्यावर सुरक्षा रक्षकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील यांच्यासह अन्य स्टाफ उपस्थित होता. 

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये रुक्मिणीनागर कराड येथील 28 वर्षीय महिलेचा समावेश आहे. कॉटेज हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी ही महिला दाखल झाली असता तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यावेळी त्या महिलेला कॉटेजमधून कृष्णा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. आता ती कोरोनामुक्त झाली आहे. आज तिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली, कृष्णा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफने घेतलेल्या काळजीमुळे मी पूर्णपणे बरी झाले असून, आता समाजाने आमच्याकडे वेगळ्या नजरेने न पाहता, आम्हालाही आपल्यात सामावून घ्यावे, असे भावनिक आवाहन या महिलेने केले.