कराड उत्तरमधील पंतगराव मानेंसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

कराड उत्तरमधील पंतगराव मानेंसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश



कराड/प्रतिनिधीः
    कराड उत्तर विधानसभा मतदार संघात काँग्रेस व राष्ट्रवादी आणि नंतर भाजपाची सलगी करणारे उत्तरेतील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंतगराव माने पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजीराव यादव बाळासाहेब माने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अनेक पक्षांच्या व गटांच्या वार्या करुन अखेर शिवबंधन हातात बांधून शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रवेश केला. यामुळे उत्तरेचे राजकारण नव्या वळणावर आल्याचे सिध्द होत आहे.
    कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अनेक राजकीय घडामोडी घडत असून भाजपाबरोबर सलगी करत वाट मळण्याचा प्रयत्न करणारे पतंगराव माने यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश केला. उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली व शिवधनुष्य हातात बांधला. या सर्व घडामोडीचे कर्तेकरविते शिवसेनेचे संपर्क प्रमुख व कृष्णा खोर्याचे उपध्यक्ष ना. नितीन बानुगडे-पाटील ना. नरेंद्र पाटील हे आहेत. यावेळी शिवसेनेचे नेते दगडुदादा सपकाळ ही उपस्थित होते. 
     शिवसेनेमध्ये पतंगराव माने यांच्यासमवेत संभाजीराव यादव, तानाजीराव माने, बाळासाहेब माने, यांचेसह अन्य सहकार्यांनी प्रवेश केला त्यामुळे कराड उत्तर मध्ये राजकीय चर्चेला उधान आले आहे. जिल्ह्यातील अन्य काही मतदारसंघातील इच्छूकही लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी केला आहे.