जिल्हा बँकेसाठी कराड सोसायटी मतदारसंघातील भूमिका गुलदस्त्यात - डॉ. अतुल भोसले

जिल्हा बँक ही शिखर संस्था असून याठिकाणी योग्य लोक निवडून जावेत, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पक्ष विचारांच्या लोकांची बैठक घेण्यात येईल. पालकमंत्री सन्माननीय आहेत, तर उदयदादा जवळचे मित्र होते. त्यामुळे कराड सोसायटी मतदारसंघात काय भूमिका घ्यायची, हे अद्याप गुलदस्त्यात असून योग्य वेळी याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहे.

जिल्हा बँकेसाठी कराड सोसायटी मतदारसंघातील भूमिका गुलदस्त्यात - डॉ. अतुल भोसले

जिल्हा बँकेसाठी कराड सोसायटी मतदारसंघातील भूमिका गुलदस्त्यात 

डॉ. अतुल भोसले : पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, समविचारी लोकांशी चर्चा करून घेणार निर्णय

कराड/प्रतिनिधी :  

      जिल्हा बँक ही शिखर संस्था असून याठिकाणी योग्य लोक निवडून जावेत, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पक्ष विचारांच्या लोकांची बैठक घेण्यात येईल. पालकमंत्री सन्माननीय आहेत, तर उदयदादा जवळचे मित्र होते. त्यामुळे या दोघांचे काय करायचे, कराड सोसायटी मतदारसंघात काय भूमिका घ्यायची, हे अद्याप गुलदस्त्यात असून योग्य वेळी याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी स्पष्ट केली.

            येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी 28 रोजी सकाळी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा बँक निवडणुकीमध्ये कराड सोसायटी मतदारसंघातून आपली नक्की काय भूमिका राहणार? या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष एकनाथ बागडी, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप नेते शेखर चारेगावकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

           डॉ. भोसले म्हणाले, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत सोयीची भूमिका घेण्याऐवजी परिस्थितीनूसार काय भूमिका घायची, हे योग्य वेळी ठरविले जाईल. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे बंधू माझे चांगले मित्र असून त्यांच्या गटाशी आमची पूर्वी सलगी होती. तर अॅड. उदयसिंह पाटील यांच्या गटाशी आमच्या गटाची यापूर्वी सलगी होती. परंतु, ती आता काही कारणांनी राहली नाही. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत एक मतदार या नात्याने आम्ही आमची भूमिका घेणार असून ती योग्य वेळी जाहीर करू, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

      त्याचबरोबर जिल्हा बँकेला आम्ही ज्याला मदत करू; तो उमेदवार नक्कीच निवडून येवू शकतो, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचक इशाराही यावेळी दिला आहे.